We love eBooks

    मिता: Mita (Marathi Edition)

    Por प्रा. माधवी भट

    Sobre

    मिता
    चित्रपटांविषयी “मिता” ला लिहिलेल्या अत्यंत विलक्षण पत्रांचा संग्रह. अप्रतिम भाषा शैली आणि विषयाचे नजाकतीने हाताळणी ही ह्या पुस्तकाची बलस्थाने आहेत.

    These are unique letters written to “Mita” about films. The language is fluid and subjects handled with ultra sensitivity."
    प्रकाशकाचे मनोगत

    अनेक जण चित्रपट, नाटक, कविता ह्या कलाप्रांताविषयी लिहित असतात. मी खूप असे लेखन वाचले आहे. बहुतेक वेळा लेखक समीक्षकाच्या भूमिकेतून लिहित असतो सहसा अस्वादात्मक लेखन वाचायला मिळत नाही.

    मिताचा पहिला लेख माझ्या वाचनात आला ...(पत्र) आणि वाचून झाल्यावर मी बराच वेळ विचार करीत राहिलो. हे काही तरी वेगळे आहे हे जाणवले होते पण काय वेगळे आहे ते कळत नव्हते. पण हळूहळू उलगडा होत गेला. मिता ही एक व्यामिश्र व्यक्ती आहे...आणि खरे तर ती एक निःशब्द श्रोता आहे जिच्याजवळ मनातले विचार निसंग्धिधपणे बोलावेत तिने ते ऐकावेत आणि चूक कि बरोबर न ठरवता...मोकळे होऊ द्यावे. पण हे एक परिमाण झाले. संवादाचे. प्रा. माधवी भट ह्यांनी ह्या संवादाचे वाहन कलाकृती बद्दल सांगण्या साठी वापरले आहे. ह्या सर्वच कलाकृती त्यांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम करून गेल्या आहेत. त्यांचे व्यक्तित्व स्पर्शिले आहे त्यांनी. जीवनातले काही क्षण त्या हा कला कृती बरोबर आणि त्या कला कृती मधील व्याक्तीरेखांबरोबर जगलेल्या आहेत. मिता मध्ये ते क्षण पुन्हा एकदा जिवंत होतात.

    तसा हा प्रवास खूप व्यक्तिगत आहे...पण वाचत असताना तो व्यक्तिगत न रहाता आपल्या सर्वांचा होतो. कुठल्याही कलाकृतीच्या मोट्ठेपणाचे हे व्यवच्छेदक लक्षण मानले जाते कारण तेंव्हाच ते लेखन वैश्विक होते.

    प्रा. माधवी भट (चंद्रपूर) हा सृजन ला लागलेला एक महत्वाचा शोध आहे. संगीतात मध्ये बी.ए. त्यानंतर नाट्य शास्त्रात एम.ए. आणि आता डॉ. अरुणाताई ढेरे यांच्या कवितांवर डॉक्टरेट च्या प्रबंधाचा आभ्यास आणि लेखन सुरु. ह्या व्यतिरिक्त अध्यापनात स्वतःला वाहून घेतलेल जीवन आणि हे सगळे उण्या पुर्या ३० वर्षांच्या कालावधीत.

    वाचकांनी अमाप प्रेम केलेल्या मिताला आणि प्रा. माधवी भट ह्यांना तुमच्या पर्यंत आणतांना खूप मोट्ठे समाधान सृजन अनुभवते आहे.



    सृजन
    Baixar eBook Link atualizado em 2017
    Talvez você seja redirecionado para outro site

    Relacionados com esse eBook

    Navegar por coleções