We love eBooks

    अरबट चरबट: Arbat Charbat (Marathi Edition)

    Por मयुरेश वाटवे

    Sobre

    अरबट चरबट
    गोव्यातील पत्रकार मयुरेश वाटवे यांनी लिहिलेला ‘अरबट चरबट’ हा दैनंदिन जीवनात अनुभवाव्या लागणाऱ्या कडू-गोड अनुभवांवर आधारित ललित लेखांचा संग्रह आहे.

    ‘Arbat Charbat’ written by journalist from Goa Mr. Mayuresh Watve is an excellent collection of articles based on sweet and bitter experience of day to day life.
    प्रकाशकाचे मनोगत

    आपण रोज अनेक अनुभवांना सामोरे जात असतो. बरे-वाईट, कडू-गोड. आपल्या मनावर त्याच्या वेगवेगळ्या प्रतिमा उमटतात. काही वेळा ते पचतात. काही वेळा पचत नाहीत. असे अनुभव शब्दबद्ध करून त्यातून काही सुसंगती शोधता येते का असा प्रयत्न असतो. पण अनेकदा विसंगतीच पदरात पडते. काही असले तरी माणूस त्यातून समृद्ध होत जातो. अशा अरबट-चरबट अनुभवांची खुसखुशीत मांडणी हे या लेखांचे वैशिष्ट्य आहे. मयुरेश वाटवे यांच्या लिखाणात वृत्तपत्रांचा मोठा वाटा आहे. लोकमत, तरुण भारत, गोमन्तक अशा गोवा आणि महाराष्ट्रातील आघाडीच्या सर्वच वृत्तपत्रांनी त्यांच्या लिखाणाला प्रोत्साहन दिले आहे. मयुरेश यांच्या लेखाची शैली नर्म विनोदाची आहे. हे लेख वाचताना हसण्याचे सात मजले उभारले जात नाहीत पण मधून मधून चेहऱ्यावर मिश्कील हास्य येत राहते आणि त्याच वेळी मयुरेश यांचे विचार स्वतःच्या अनुभवांशी तपासून पाहतो तेव्हा लिखाणातले मर्म सहज उलगडत जाते. गोव्याला निसर्ग सौदर्याची आणि सण-उत्सवांची देणगी आहे. गोव्याची ही खासियत या लेखांमध्येही डोकावते. हे लेख म्हणजे खरतर अनुभवांची भेळ आहे. पण त्यांना शब्दात मांडण्याची मयुरेश यांची स्वतःची एक स्वतंत्र रेसिपी आहे. आणि म्हणून हे लेख वाचताना आपसूकच वाचनाची चटपटीत, आंबट-गोड, अशी टेस्ट रेंगाळते.
    Baixar eBook Link atualizado em 2017
    Talvez você seja redirecionado para outro site

    Relacionados com esse eBook

    Navegar por coleções