We love eBooks

    कान्हू वारकरी: Kanhu Varkari (Marathi Edition)

    Por अशोकानंद महाराज कार्डीले

    Sobre

    कान्हू वारकरी
    अशोकानंद महाराज कर्डिले हे नाव आज खूपच सुपरिचित आहे. भागवत, ज्ञानेश्वरी वरील अत्यंत रसाळ प्रवचने हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे. त्यापेक्षाही महत्वाचे त्यांचे वैशिष्ट्य जे मला जाणवले ते म्हणजे महाराज अध्यात्माचा उपयोग ग्रामीण भागातील आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्या साठी करतात.
    प्रकाशकाचे मनोगत



    “न लिहिलेली पत्रे” ह्या आमच्या एका फेसबुक वरील चळवळी मधून कान्हू वारकरी जन्माला आला. आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे!

    अशोकानंद महाराज कर्डिले हे नाव आज खूपच सुपरिचित आहे. भागवत, ज्ञानेश्वरी वरील अत्यंत रसाळ प्रवचने हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे. त्यापेक्षाही महत्वाचे त्यांचे वैशिष्ट्य जे मला जाणवले ते म्हणजे महाराज अध्यात्माचा उपयोग ग्रामीण भागातील आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्या साठी करतात.

    कान्हू वारकरी आपली पत्रे तुकाराम महाराजांना लिहितो. प्रत्येक पत्रात तो एक महत्वाची समस्या त्यांच्या पुढे मांडतो. नुसती समस्या मांडत नाही तर तुकोबाच्या गाथांमध्ये किंवा ज्ञानेश्वरी मध्ये ह्या समस्यावर काय उपाय सुचवला आहे आणि तो कसा व्यवहार्य आहे हे सुद्धा अत्यंत प्रभावी पण मांडतो.

    पत्रांमध्ये दृष्टांत भरपूर आहेत आणि त्यामुळे ती खूप वाचनीय झाली आहेत. आज शहरी विभागात राहाणाऱ्या आमच्या सारख्यांना ग्रामीण भागातील समस्या समजणे आणि उमजणे खूप कठीण झाले आहे. मुळात आपण ग्रामीण भागापासून आपल्या शेतकऱ्या पासून आपली नाळ तोडून टाकली आहे कि काय अशी भीती मनात निर्माण व्हावी अशी परिस्थिती सध्या आहे.

    कान्हू वारकरी तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या मुळाशी जुडण्यास मदत करेल अशी आम्हाला खात्री आहे.

    आमचे स्नेही आणि न लिहिलेली पत्रे चे सह संचालक प्राचार्य चंद्रकांत भोसले ह्यांचे ह्या प्रसंगी विशेष आभार मानणे आवश्यक आहे त्यांनी नगर जिल्ह्यातील अनेक लेखकांना सृजन चे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि सृजन ला एका चळवळीचे स्वरूप दिले.

    तुम्हाला कान्हू वारकरी खूप आवडेल आणि तुमच्या विचाराना एक वेगळी आणि चांगली दिशा देईल ह्याची सृजन ला खात्री आहे.



    सृजन
    Baixar eBook Link atualizado em 2017
    Talvez você seja redirecionado para outro site

    Relacionados com esse eBook

    Navegar por coleções