We love eBooks

    ग्रामीण साहित्यातील स्त्री चित्रण : भाग २: Gramin Sahityatil Stri Chitran Part 2 (Marathi Edition)

    Por डॉ. बाबुराव उपाध्ये

    Sobre

    ग्रामीण साहित्यातील स्त्री चित्रण - भाग २
    ‘ग्रामीण साहित्यातील स्त्रि जीवन’ हे डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी डॉ. आनंद यादव यांच्या साहित्यातील स्त्री – व्यक्तिरेखांचे केलेले संशोधनात्मक लिखाण आहे.

    ‘Gramin Sahityatil Stree Jivan’ written by Dr. Baburao Upadhye is a research paper about female characters from the literature of Dr. Anand Yadav
    प्रस्तावना

    कृषीपूर्व काळापासून आजच्या औद्योगिक युगातील भारतीय स्त्रीजीवनाच्या पार्श्वभूमीवर, मराठी साहित्य परंपरा लक्षात घेऊन, डॉ. आनंद यादव यांच्या साहित्यविश्वातील स्त्री-व्यक्तिरेखांची पाहणी आणि तपासणी येथे केलेली आहे. आनंद यादवांच्या लेखनातून सातत्याने प्रक्षेपित झालेल्या ‘तारा’ या मातृप्रतिमेचा अनेकांगी, सूक्ष्म व तपशीलवार अभ्यास येथे आलेला आहे. देशी-विदेशी साहित्यकृतीतील सदृश्य स्त्री-प्रतिमांशी ‘तारा’ची केलेली तुलना साहित्यिक आणि सांस्कृतिक अंगानेही महत्वाची आहे. यादवांच्या ४३३२ पृष्ठांच्या लेखनातून साकार झालेल्या ५८३ स्त्री व्यक्तिरेखांच्या निरीक्षणांनी येथील निष्कर्षांना भरीवपणा आणि अभ्यासाला व्यापाक पाया प्राप्त झालेला आहे. येथे व्यक्तिचित्रण या घटकाचा तात्त्विक, तांत्रिक, ऐतिहासिक, आणि तौलनिक विचार आहे आणि त्याचे कौशल्यपूर्ण उपाययोजनही आहे. सामाजिकता आणि कलात्मकता या दोन्हींचे भान ठेवून आणि संशोधनाची शिस्त पाळून केलेला हा अभ्यास नवी दृष्टी देणारा आहे. डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या प्रज्ञेचे, प्रतिभेचे, आणि परिश्रमाचे हे प्रसादफल आहे. साहित्यगत ग्रामीण स्त्री-जीवनाचा फारसा विचार झालेला नाही; हे लक्षात घेता त्यांच्या अभ्यासाचे मोल ठळकपणे जाणवेल असेच आहे.

    - डॉ. र. बा. मंचेकर
    Baixar eBook Link atualizado em 2017
    Talvez você seja redirecionado para outro site

    Relacionados com esse eBook

    Navegar por coleções