We love eBooks

    बारकीची पत्रे: Barkichi Patre (Marathi Edition)

    Por प्रा. माधवी भट

    Sobre

    बारकीची पत्रे
    कोण आहे ही बारकी? शाळेत जाणारी एक लहान मुलगी. तिचे स्वतःचे एक भावविश्व आहे. त्या मध्ये तिची आजी आजोबा, तिचा मित्र सम्प्या, आणि इतर मित्र....आणि तिचे...
    प्रकाशकाचे मनोगत

    प्रा. माधवी भट, संगीतात मध्ये बी.ए. त्यानंतर नाट्य शास्त्रात एम.ए. आणि आता डॉ. अरुणाताई ढेरे यांच्या कवितांवर डॉक्टरेट च्या प्रबंधाचा आभ्यास आणि लेखन सुरु. ह्या व्यतिरिक्त अध्यापनात स्वतःला वाहून घेतलेल जीवन आणि हे सगळे उण्या पुर्या ३० वर्षांच्या कालावधीत.

    सुजन च्या अंतर्गत चालणाऱ्या न लिहिलेली पत्रे ह्या पात्रांना वाहिलेल्या फेसबुक पेज साठी साधारणतः मे २०१३ मध्ये प्रथमच त्यांनी बारकीचे एक सुंदर पत्र पाठवले. ते मी वाचले आणि तात्काळ बारकीच्या आणि त्या लेखनाच्या प्रेमात पडलो. मी त्यांना विनंती केली कि तुम्ही नियमित हे लेखन करावे. त्यांनी ती विनंती मान्य केली.

    कोण आहे ही बारकी? शाळेत जाणारी एक लहान मुलगी. तिचे स्वतःचे एक भावविश्व आहे. त्या मध्ये तिची आजी आजोबा, तिचा मित्र सम्प्या, आणि इतर मित्र....आणि तिचे....त्या गावातली रेल्वे लाईन, आणि त्या रुळांच्या बाजूची हिरवी गर्द झाडी, फुले सर्व काही. तिची निरागसता मनाला अत्यंत भावणारी. चिंचेच्या झाडावरच्या चिंचा असोत नाहीतर सर्वांगसुंदर चहा असो..सायकल चालवायला शिकत असताना पडणे असो, नाहीतर शाळेतील मनोहर स्नेहसंमेलन असो...त्याचे वर्णन इतके लाघवी आहे कि वाचक सतत ओठांवर एक स्मित हास्य घेऊनच ते वाचतो.

    माझ्या मते बारकी हि एक संकल्पना आहे. ते एक स्वप्न आहे आणि प्रत्येक वाचकाच्या मनात बारकी वसत असतेच....त्याच्या त्याच्या स्वभावा नुसार. इतकी की ही बारकी हि प्रा. माधवी भट ह्यांची व्यक्तित्वाचा सुद्धा एक अविभाज्य भाग होऊन बसली आहे.

    वाचकांनी अमाप प्रेम केलेल्या बारकीला आणि प्रा. माधवी भट ह्यांना तुमच्या पर्यंत आणतांना खूप मोट्ठे समाधान सृजन अनुभवते आहे.

    सृजन
    Baixar eBook Link atualizado em 2017
    Talvez você seja redirecionado para outro site

    Relacionados com esse eBook

    Navegar por coleções